India Israel FTA : भारत-इस्राईल मैत्रीचे नवे पर्व सुरू, महाराष्ट्राला महासंधी; ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या अटी-शर्तींवर स्वाक्षरी

India Israel Trade Agreement : या करारामुळे गुंतवणूक वाढून भारतात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. इस्राईलमधील मेट्रो प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील कंपन्यांना सहभागी होण्याची मोठी संधी मिळणार आहे.
Indian Commerce Minister Piyush Goyal signing the historic Free Trade Agreement terms with Israeli Industry Minister Nir Barkat in Tel Aviv, boosting bilateral trade and Maharashtra investment opportunities.

Indian Commerce Minister Piyush Goyal signing the historic Free Trade Agreement terms with Israeli Industry Minister Nir Barkat in Tel Aviv, boosting bilateral trade and Maharashtra investment opportunities.

esakal

Updated on

Summary

  1. भारत आणि इस्राईलने ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या (FTA) अटी-शर्तींवर अधिकृत स्वाक्षरी केली.

  2. या करारामुळे कृषी, संरक्षण, अवकाश, एआय, आयटी व स्टार्टअप क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

  3. भारतीय शेतकरी, मच्छिमार आणि उद्योगांसाठी इस्राईलची बाजारपेठ अधिक खुली होणार आहे.

तेल अवीव (इस्राईल), ता. २० - भारत-इस्राईलदरम्यानच्या एेतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या (फ्री ट्रेड अँग्रीमेंट) अटी-शर्तींवर आज उभय देशांमध्ये स्वाक्षरी झाली. भारताचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आज संध्याकाळी येथे ही घोषणा केली. मुक्त व्यापार कराराच्या दिशेने पडलेले आजचे पाऊल उभय देशांमधील मैत्रीचे आणि सामुदायिक समृद्धीचे नवे पर्व ठरणार आहे, अशी भावना गोयल यांनी भारतातील निवडक पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com