आता ‘हिंदी-जपानी’ भाई भाई

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 8 October 2020

५ जी क्षेत्रात चिनी तंत्रज्ञान नाकारताना भारताने आता जपानसोबत सहकार्याचा हात पुढे केला असून दोन्ही देशांनी सामरिक भागीदारीअंतर्गत सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, ५ जी या मुद्द्यांवर व्यापक कराराची तयारी केली आहे.

नवी दिल्ली - ५ जी क्षेत्रात चिनी तंत्रज्ञान नाकारताना भारताने आता जपानसोबत सहकार्याचा हात पुढे केला असून दोन्ही देशांनी सामरिक भागीदारीअंतर्गत सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, ५ जी या मुद्द्यांवर व्यापक कराराची तयारी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्वाड परिषदेसाठी जपानमध्ये असलेले परराष्ट्रमंत्री  एस. जयशंकर आणि जपानचे परराष्ट्रमंत्री मोटेगी तोशिमित्सु यांच्यात १३ व्या भारत जपान सामरिक संवाद झाला. यादरम्यान सायबर सुरक्षेशी निगडित कराराच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. तसेच परस्पर विश्वास वृद्धिंगत करण्याबरोबरच भारत आणि जपानमधील विशेष सामरिक आणि वैश्विक भागिदारीतील प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. यामध्ये सागरी सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, उत्पादन क्षेत्र, कौशल्य विकास, संपर्क आणि पायभूत सुविधा, आरोग्य यासोबतच इंडो-पॅसिफिक सागरी उपक्रम आणि संयुक्त राष्ट्र संघातील प्रस्तावित सुधारणा (सुरक्षा परिषदेचा विस्तार) या प्रमुख मुद्द्यांचा समावेश होता. दरम्यान, पुढील वार्षिक द्विपक्षीय शिखर बैठक भारतात घेण्याचेही या बैठकीदरम्यान ठरले. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या सोयीनुसार बैठकीचे वेळापत्रक निश्चित केले जाईल. 

CBIच्या माजी संचालकांची आत्महत्या; गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

डिजिटल तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व बघता दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी मजबूत परंतु लवचिक डिजिटल आणि सायबर व्यवस्थेची गरज, या सामरिक संवादादरम्यान व्यक्त केली. तसेच सायबर सुरक्षेशी निगडित दोन्ही देशांमधील कराराच्या मसुद्यालाही मान्यता देण्यात आली. हा करार सायबर सुरक्षा क्षेत्रात क्षमता वृद्धी, संशोधन आणि विकास, माहितीशी संबंधित महत्त्वाच्या पायाभूत व्यवस्थेचा विकास, ५ जी, कृत्रिम बुद्धीमत्ता, माहिती आदानप्रदानासाठी संगणकीय उपकरणांना एकमेकांशी जोडणारी यंत्रणा- इंटरनेट ऑफ थिंग्ज या क्षेत्रात दोन्ही देशांच्या सहकार्याचा मार्ग प्रशस्त करणारा असेल. यासोबतच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि वैश्विक मुद्द्यांवर चर्चा करताना दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी भारत आणि जपानच्या  मजबूत भागीदारीवर भर दिला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Japan Approval of the draft Cyber Security Agreement