Kanha Tiger Reserve tiger cub death latest update
esakal
मांडला (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पातील (केटीआर) सर्ही क्षेत्रात एका वाघाच्या बछड्याचा मृतदेह आढळला आहे. गेल्या पाच दिवसांतील ही तिसरी घटना (tiger cub death in Kanha Tiger Reserve) असून, यामुळे खळबळ उडाली आहे. राज्यात सात जानेवारीपासून आतापर्यंत २५ वाघांचा मृत्यू झाला असून, यात बछड्यांचाही समावेश आहे.