esakal | India: दिव्‍यांग तुराखिया सर्वांत धनवान युवा उद्योजक
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्‍यांग तुराखिया सर्वांत धनवान युवा उद्योजक

दिव्‍यांग तुराखिया सर्वांत धनवान युवा उद्योजक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : सरकारच्या उद्योगस्नेही धोरणांचा लाभ घेत ज्या युवकांनी स्वकतृत्वावर उद्योग उभारून तो यशस्वी करून दाखविला अशा चाळीशीतील व त्यापेक्षा कमी वयातील धनाढ्य उद्योजकांमध्ये ‘मीडिया नेट’चे दिव्‍यांग तुराखिया (वय ३९) यांचे नाव सर्वोच्च स्थानी झळकले आहे. ‘आयआयएफएल वेल्थ अँड हरुन इंडिया ४० आणि त्याखालील वयोगटातील श्रीमंत २०२१’ च्या यादीत तुराखिया हे प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती १२ हजार ५०० कोटी रूपये आहे.

भारतातील उद्योग क्षेत्राला बळ देण्यासाठी आणि होतकरू युवकांनी व्यवसायात येण्यासाठी केंद्र सरकारने स्टार्टअप व्यवसायांना प्रोत्साहन देण्यास सुरू केल्यापासून त्याचे चांगले परिणाम दिसू लागल्याचे या युवा उद्योजकांच्या यादीवरून दिसते. यातील सहभागी ४५ उद्योजकांपैकी अनेकांनी तंत्रज्ञानाच्या साह्याने नावीन्यपूर्ण स्टार्टअप सुरू केलेले आहेत. यातील प्रत्येकाची संपत्ती एक हजार कोटींपेक्षा अधिक आहे. १५ सप्टेंबर २०२१ रोजीच्या मालमत्तेचा आधार या यादीसाठी घेण्यात आला आहे. या आधी ‘हरुन इंडिया’ने ३० सप्टेंबर २०२१ रोजी भारतातील श्रीमंतांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता श्रीमंत युवा उद्योजकांची यादी जाहीर केली आहे.

हेही वाचा: प्रा. राजन शिंदे खून प्रकरण : ‘एसआयटी’चे पथक देऊळगाव राजाला रवाना

‘ब्राउझरस्टॅक’चे सहसंस्थापक नकुल आग्रवाल (३८) आणि रितेश अरोरा (३७) दुसऱ्या स्थानी आहेत. ‘ईझमाय ट्रीप’च्या आयपीओला यंदा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या कंपनीचे रिकांत पित्ती (३३), निशांत पित्ती (३५) आणि प्रशांत पित्ती (३७) हे तीन संस्थापक प्रथमच या यादीत झळकले आहेत. मनीष कुमार दाबकारा (३७) हे ‘ईकेआय एनर्जी’चे संस्थापकांचे नावही या यादीत असून बिगर तंत्रज्ञान क्षेत्रातील ते एकमेव उद्योजक ठरले आहे.

यादीची वैशिष्ट्ये

 • सर्व उद्योजकांची एकत्रित संपत्ती सुमारे एक लाख ६५ हजार ६०० कोटी रुपयांच्या दरम्यान

 • गेल्या वर्षापेक्षा संपत्ती सुमारे २६८ टक्के वाढीची नोंद

 • बंगळूरमधील १५ , नवी दिल्लीतील आठ व मुंबईतील पाच उद्योजकांचा समावेश

 • भारताबाहेरील तीन उद्योजकांचा समावेश

 • उद्योजकांचे सर्वसाधारण वय ३४ वर्षे

हेही वाचा: आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का? - राम कदम

‘भारत पे’चे शाश्‍वत नकरानी (वय २३) सर्वांत कमी वयाचे उद्योजक

 • दिव्‍यांग तुराखिया १२,५०० दुबई

 • नकुल आग्रवाल व रितेश अरोराज १२, ४०० मुंबई

 • नेहा नारखेडे व परिवार १२,२०० पालो अल्टो

 • निखिल कामत ११, १०० बंगळूर

 • रिजू रवींद्रन ८,१०० बंगळूर

 • बिन्नी बन्सल ८,००० बंगळूर

 • सचिन बन्सल ७,८०० बंगळूर

 • भाविश आग्रवाल ७,५०० बंगळूर

 • रितेश आग्रवाल ६,३०० नवी दिल्ली

‘हरुन’च्या यादीत समावेश झालेले उद्योजक भारतातील उगवत्या युवा उद्योजकांना प्रतिनिधित्व करीत आहेत. या सर्वांनी नेत्रदीपक कामगिरी करून हा पल्ला गाठत यादीत स्थान मिळविले आहे.

- अनास रहमान जुनेद, संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक, हरुन इंडिया

loading image
go to top