India Pakistan Tensions: तुलबुल प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली; तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार
Water Rights : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सिंधू जलवाटप कराराचे पुनरावलोकन सुरू केले असून, तुलबुल नेव्हिगेशन प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. देशाच्या पाण्याच्या हक्कांचा अधिकाधिक वापर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानबरोबर भारताच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सिंधू जलवाटप कराराच्या स्थगितीनंतर ‘तुलबुल नेव्हिगेशन लॉक प्रकल्प’ पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने हालचाल सुरू केली आहे.