धनबाद - ‘भारताच्या सार्वभौमत्वाचे अधिष्ठान हे जमिनीखालील संसाधनांवर प्रभुत्व मिळवण्यात आहे. ऊर्जा प्रणालीच्या क्षेत्रातही भारताने पुढे जाण्याची गरज आहे,’ असे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी म्हटले आहे..जागतिक आघाड्या तुटत चाललेल्या या काळात भारताने स्वतःचा विकासमार्ग निश्चित केला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. धनबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (इंडियन स्कूल ऑफ माइन्स) शताब्दीच्या सोहळ्यात प्रमुख भाषण करताना ते बोलत होते.अदानी म्हणाले, ‘जगभरातील राष्ट्रे केवळ स्वार्थाच्या आधारावर वागत आहेत आणि भारताने सध्याच्या काळात ऊर्जा पुरवणाऱ्या प्रणालींवर प्रभुत्व मिळवले पाहिजे. या शतकातील भारताचे सार्वभौमत्व त्या राष्ट्राच्या नैसर्गिक संसाधनांवरील आणि ऊर्जा प्रणालींवरील नियंत्रणावर अवलंबून असेल. जगात भारताने स्वतःचा विकासमार्ग निश्चित करणे आवश्यक आहे.’.अदानी यांनी इतिहासातून शिकण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जेव्हा बख्तियार खिलजीने नालंदा या तात्कालीन जगप्रसिद्ध ज्ञानकेंद्राला आग लावून नष्ट केले आणि नंतर ब्रिटिशांनी अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भारताला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, याची आठवण त्यांनी करून दिली. ‘भारत स्वप्ने विकणारा नव्हे, तर ती प्रत्यक्षात आणणारा देश आहे,’ असेही ते म्हणाले..अदानी पुढे म्हणाले, ‘भारताने बाह्य शक्तींना कमजोर करू नये. सध्याचा काळ हा भारताचा दुसरा स्वातंत्र्यलढा आहे. आर्थिक आणि संसाधनात्मक स्वातंत्र्य गरजेचे आहे. भारताने स्वतःसाठी सर्वोत्कृष्ट काय आहे तेच करायला हवे.संसाधन, ऊर्जा व तंत्रज्ञान या क्षेत्रांत क्षमता विकसित कराव्यात. आपण स्वतःचे कथानक नियंत्रित केले नाही, तर आपल्या आकांक्षा दुर्बल केल्या जातील आणि आपल्या जीवनमान उंचावण्याच्या अधिकाराकडे जागतिक अपराध म्हणून पाहिले जाईल.’’.ऑस्ट्रेलियातील अदानी समूहाच्या कारमायकेल कोळसा खाण प्रकल्पाचा उल्लेख करून ते म्हणाले, ‘हा प्रकल्प भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्यासाठी सुरू केला होता. मात्र, तो शतकातील सर्वांत वादग्रस्त पर्यावरणीय आणि राजकीय लढायांपैकी एक ठरला. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी आम्हाला बदनाम केले, न्यायालयात ओढले, प्रकल्प सोडून द्यावा यासाठी दबाव टाकला.मात्र, आम्ही मागे हटलो नाही, कारण हा राष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेशी संबंधित प्रश्न होता. ‘आयआयटी धनबाद’ची स्थापनादेखील राष्ट्रीय दूरदृष्टीतून झाली. लोक खाणकाम क्षेत्राला जुनी अर्थव्यवस्था म्हणतात. मात्र, खाण क्षेत्र अस्तित्वात नसते, तर नवी अर्थव्यवस्था अस्तित्वातच आली नसती.’.‘७५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार’‘अदानी समूह पुढील पाच वर्षांत ऊर्जा क्षेत्रात ७५ अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक गुंतवणूक करणार आहे. सन २०३० पर्यंत पूर्ण क्षमतेने या गुंतवणुकीच्या माध्यमातून ३० गिगावॉट हरित ऊर्जा निर्माण करील. सरासरी घरगुती वापराच्या दृष्टीने पाहता, हे दर वर्षी सहा कोटींहून अधिक घरांना वीजपुरवठा करण्याइतके आहे,’ असेही उद्योजक गौतम अदानी यांनी म्हटले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.