भारताला हवेत चार लाख डॉक्‍टर्स

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं आरोग्य तपासायचं, तर दर हजारी लोकसंख्येच्या प्रमाणात किती डॉक्‍टर्स उपलब्ध आहेत, हे पाहिलं जातं. संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारत विकसित आणि अनेक विकसनशील देशांच्या तुलनेत वैद्यकीय सेवेबाबत खूप मागं आहे. आकडेवारी जरा खोदली, तर आजच्या घडीला भारतात तब्बल तीन लाख डॉक्‍टर्स उपलब्ध झाले, तरच दर हजार लोकांमध्ये एक डॉक्‍टर मिळू शकतो. सध्या हे प्रमाण 1,668 लोकांमागे एक डॉक्‍टर इतकं आहे.

मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया या सर्वोच्च संस्थेच्या आकडेवारीनुसार, भारतात 9, 88, 922 डॉक्‍टर्स आहेत, जे ऍलोपथीची प्रॅक्‍टीस करतात. विविध राज्यांच्या वैद्यकीय मंडळांकडं या डॉक्‍टर्सची नोंदणी आहे. आकडेवारी 30 जुन 2016 पर्यंतची आहे.

यापैकी 80 टक्के डॉक्‍टर्स प्रत्यक्ष सेवेसाठी उपलब्ध आहेत, असं मानलं, तर भारतात साधारणपणे 7.91 लाख डॉक्‍टर्स उपलब्ध होतात. परिणामी, 1,668 लोकांमागे एक डॉक्‍टर असं प्रमाण पडतं. भारताची लोकसंख्या सध्या 1.32 अब्ज आहे. या लोकसंख्येला दर हजारी एक डॉक्‍टर हवा असेल, तर देशात आजघडीला तब्बल 13 लाख डॉक्‍टर्स थेट सेवेत हवेत. म्हणजे सध्या आहेत, त्यापेक्षा कमीत कमी चार लाख जास्त डॉक्‍टर्स देशात काम करायला हवेत.

तातडीच्या भविष्यात तशी शक्‍यता दिसत नाही. कारण देशात दरवर्षी जास्तीत जास्त 65, 138 डॉक्‍टर्स निर्माण होऊ शकतात. देशभरात पसरलेली 472 मेडिकल कॉलेज मिळून तेवढ्याच विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रवेश देऊ शकतात. या व्यतिरिक्त 308 दंत महाविद्यालये आहेत, जिथे 26, 690 जागा असतात. सरकारनं कितीही प्रयत्न केले, तरी चार लाख डॉक्‍टर्सची कमतरता भरून निघण्याची शक्‍यता दिसत नाही. ज्या प्रमाणात डॉक्‍टर्स उपलब्ध होतील, त्याच्याहून अधिक वेगाने देशाची लोकसंख्या विस्तारत जाणार आहे.

लोकसंख्येनं महाराष्ट्राएवढा आणि आकाराने महाराष्ट्राच्या तीनपटीनं लहान असणारा दक्षिण अमेरिकेतील क्‍युबा हा देश डॉक्‍टर आणि लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जगात अव्वल मानला जातो. क्‍युबामध्ये दर 170 लोकांमागे एक डॉक्‍टर आहे. त्यानंतर बेलारूस नावाच्या चिमुकल्या देशाचा आणि बेल्जियमचा नंबर लागतो. तिथे दर 220 लोकांसाठी एक डॉक्‍टर उपलब्ध आहे. पाकिस्तानमध्ये भारतापेक्षा बरं म्हणजे 1,400 लोकांमागं एक डॉक्‍टर असं प्रमाण आहे. भुतान, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमध्ये भारतापेक्षा अत्यंत बिकट परिस्थिती आहे. अमेरिकेमध्ये दर 390 लोकांमागे एक डॉक्‍टर तर चीनमध्ये हेच प्रमाण दर 950 लोकांमागे एक डॉक्‍टर इतकं आहे.

Web Title: India needs 3 lac doctors