esakal | काँग्रेस नेत्यानं म्हटलं, भारतालाही एका ज्यो बायडनची गरज
sakal

बोलून बातमी शोधा

jo biden main.jpg

बायडन हे अमेरिकन नागरिकांना एकत्रित करतील आणि आपल्या पूर्वसुरींप्रमाणे विभाजन करणार नाहीत. 

काँग्रेस नेत्यानं म्हटलं, भारतालाही एका ज्यो बायडनची गरज

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांचा विजय झाला आहे. ज्यो बायडन अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष असतील. बायडन यांच्या विजयानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनीही बायडन यांना शुभेच्छा देत उपहासात्मक भाष्य केले आहे. भारतालाही एका ज्यो बायडन यांची गरज आहे. अपेक्षा आहे की, 2024 मध्ये आम्हाला असाच एक नेता मिळेल. 

दिग्विजय सिंह यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, सर्व अमेरिकन मतदारांनी ज्यो बायडन यांना निवडून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. बायडन हे अमेरिकन नागरिकांना एकत्रित करतील आणि आपल्या पूर्वसुरींप्रमाणे विभाजन करणार नाहीत. 

हेही वाचा- MP Exit Polls: मध्य प्रदेशमध्ये भाजप-काँग्रेसला किती जागा मिळतील?

ते पुढे म्हणाले की, आता भारतातही एका ज्यो बायडनची गरज आहे. अपेक्षा आहे की, आम्हाला 2024 मध्ये असा एक नेता मिळेल. पक्षाशी संबंधित असूनही प्रत्येक भारतीयांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भारतात विभाजनकारी शक्तींना पराभूत करावे लागेल. आम्ही सर्वात आधी भारतीय आहोत. 

हेही वाचा- अर्णब यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या दोन भाजप नेत्यांना अटक

दरम्यान, अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार बायडन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत झाली. यात बायडन यांनी ट्रम्प यांचा पराभव केला. 77 वर्षीय माजी उपराष्ट्राध्यक्ष बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असतील. बायडन यांना 270 हून अधिक इलेक्टोरल मते मिळालेली आहेत.