अर्णब यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या दोन भाजप नेत्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

अर्णब गोस्वामी यांनी 53 वर्षीय इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्त्येसाठी प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात गेल्या बुधवारी अटक करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : रिपब्लिक टिव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांच्या समर्थनार्थ भाजपाच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रविवारी राजघाटजवळ प्रदर्शन केलं. दिल्ली पोलिसांनी या प्रदर्शनात सामिल असणाऱ्या भाजपच्या नेत्यांना अटक केली आहे. भाजपचे नेते तेजिंदर बग्गा आणि कपिल मिश्रा यांनी अटक करण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी यांनी 53 वर्षीय इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्त्येसाठी प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात गेल्या बुधवारी अटक करण्यात आली आहे. सध्या अर्णब गोस्वामी हे न्यायालयीन कोठडीत आहेत आणि त्यांच्या जामीनाबाबत अद्याप हायकोर्टात सुनावणी होणे बाकी आहे. 

अर्णब गोस्वामी यांना रविवारी अलिबागमधून तलोजा जेलमध्ये नेलं आहे. पोलिसांच्या ज्या व्हॅनमधून त्यांना नेलं जात आहे त्या व्हॅनच्या खिडक्यांवर काळे पडदे लावण्यात आले आहेत. व्हॅनच्या आतून अर्णब यांनी माझ्या जीवाला धोका आहे, मला वकीलांना भेटू दिलं जात नाहीये तसेच मला मारलं गेलं आहे, असे आरोपही केले आहेत.

हेही वाचा - Corona Updates: दिलासादायक! जगातील सर्वात कमी मृत्यूदर भारतात

इंटेरियर डिझायनरच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल मागच्या बुधवारी सकाळी अर्णब यांना अटक करण्यात आली होती. या अटकेवेळी एका महिला पोलिस अधिकाऱ्याला मारहान केल्याच्या आणखी एका आरोपाचा FIR दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर आरोप आहे की जेंव्हा त्यांना अटक करायला पोलिस त्यांच्या घरी गेले तेंव्हा त्यांनी महिला पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केली. गोस्वामी यांच्या विरोधात आयपीसीच्या 353, 504 आणि 34 अंतर्गत एनएम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही पहा - आज काय विशेष: अर्णब गोस्वामीला का अटक करण्यात आलीये ?

गोस्वामी यांनी दावा केलाय की पोलिसांनी त्यांच्या घरी घुसून त्यांच्यासोबत दुर्व्यवहार केला आहे. ज्या प्रकरणी अटक झालीय ते प्रकरण 2018 सालचं आहे. अन्वय नाईक यांनी रिपब्लिक चॅनेलच्या स्टुडीओमधील इंटेरियर डिझायनिंगचं काम केलं होतं. मात्र, त्या कामाचे पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी 2018 साली आत्महत्त्या केली होती. आत्महत्त्येच्या आधी अन्वय नाईक यांनी एक सुसाईड नोट मागे ठेवली होती ज्यामध्ये अर्णब गोस्वामी यांना दोषी धरण्यात आलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kapil Mishra Tajinder Bagga arrested amid protest against Arnab Goswamis arrest