परिक्षेला प्रवेश नाकारल्याने तरुणाची आत्महत्या

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

बंगळूर : अभियांत्रिकीच्या परिक्षेला प्रवेश नाकारल्याने वीस वर्षाच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शहरातील एम. व्ही. जयरामन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला परिक्षेसाठी कमी उपस्थिती असल्याचे कारण देत परिक्षेसाठीचे प्रवेशपत्र देण्यास महाविद्यालयाने नकार दिला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या विद्यार्थ्याने तो राहत असलेल्या ठिकाणी आत्महत्या केली. या प्रकरणी कोडुगोडी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

■ अस्वस्थ झाल्यावर हे करा

  • कितीही अवघड परिस्थिती असली तरीही आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही.
  • जीवन अनमोल आहे. अडचणींवर आणि समस्यांवर मात करत जगणे महत्त्वाचे आहे.
  • अस्वस्थ मानसिकता झाल्यावर शांत राहावे.
  • जवळच्या व्यक्तीशी आपल्या समस्यांबाबत चर्चा करून व्यक्त झाल्यास मार्ग निघू शकतो.
Web Title: india news Bengaluru news suicide news engineering student