हिंदीशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही : नायडू

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

देशभरात हिंदीविरोधी वातावरण निर्माण झालेले असताना केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी हिंदी ही राष्ट्रीय भाषा असून हिंदी भाषेशिवाय भारताचा विकास होऊ शकत नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

अहमदाबाद (गुजरात) : देशभरात हिंदीविरोधी वातावरण निर्माण झालेले असताना केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी हिंदी ही राष्ट्रीय भाषा असून हिंदी भाषेशिवाय भारताचा विकास होऊ शकत नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

नायडू म्हणाले, "हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा आहे. हिंदीशिवाय भारताचा विकास होणे अशक्‍य आहे. सध्या सर्वजण इंग्रजी माध्यमाच्या मागे लागले आहेत, हे दुर्दैव आहे. मी ब्रिटिशांच्याविरुद्ध आहे. मात्र त्यांच्या भाषेच्याविरुद्ध नाही. आपण सर्व भाषा शिकायला हव्यात. मात्र इंग्रजी भाषा शिकल्यानंतर आपली मानसिकता बदलते. हे चुकीचे असून ते देशहिताच्या विरुद्ध आहे. देशातील बहुतेक नागरिक हिंदी भाषेत बोलतात. त्यामुळे हिंदी भाषा शिकणे महत्वाचे आहे. मात्र त्यापूर्वी आपण आपली मातृभाषा शिकणेही महत्वाचे आहे.'

नागरिकांकडून हिंदी भाषेला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर नायडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विशेषत: दक्षिणेकडील राज्यांतून विशेष विरोध होत आहे. बंगळूरमधील मेट्रो रेल्वेतील फलकांवर करण्यात आलेल्या हिंदी भाषेच्या वापराविरुद्ध निदर्शने करण्यात येत आहेत. तर तमिळनाडूतील रस्त्यांवरील फलकांवर करण्यात आलेल्या हिंदी भाषेचा वापरालाही तीव्र विरोध करण्यात येत आहे. कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांत हिंदी भाषा लादण्यात येत असल्याचा आरोप काही राजकीय पक्षांनी केला आहे.

Web Title: india news hindi language M Venkaiah Naidu national news