महात्मा गांधी हे चतुर बनिया होते : अमित शहा

वृत्तसंस्था
रविवार, 11 जून 2017

अमित शहा यांचे वादग्रस्त वक्तव्य; काँग्रेसकडून माफीची मागणी

रायपूर - महात्मा गांधी हे चतुर बनिया होते, त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता असे वादग्रस्त विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केल्यानंतर काँग्रेसने भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. शहा यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

सोनिया गांधी यांच्यानंतर पक्षाचा अध्यक्ष कोण असेल, हे सर्वांना माहिती आहे; पण माझ्यानंतर भाजपचा अध्यक्ष कोण असेल, हे कोणीही सांगू शकणार नाही, असे प्रतिपादन शहा यांनी येथे आयोजित निवडक लोकांच्या कार्यक्रमात बोलताना केले होते. त्यांच्या या वक्तव्याला काँग्रेस नेत्यांनी तीव्र आक्षेप घेत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ''एखादी विशिष्ट विचारधारा अथवा तत्त्वाशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही, केवळ स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेले ते विशेष प्रकारचे माध्यम होते. सुरवातीस एका ब्रिटिश व्यक्तीने क्‍लबच्या रूपात काँग्रेसची स्थापना केली होती. त्यानंतर त्याचे रूपांतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या संघटनेमध्ये करण्यात आले. तेव्हा काँग्रेसमध्ये उजव्या आणि डाव्या विचारांची माणसे होती. यात मौलाना आझाद, पंडित मदन मोहन मालवीय आणि अन्य जणांचा समावेश होता.'' असे शहा म्हणाले होते.

केवळ भाजप, माकपमध्ये लोकशाही
काँग्रेसचे विसर्जन करण्याचे महात्मा गांधी यांचे स्वप्न त्यांच्याच पक्षातील काही मंडळी पूर्ण करत आहेत. भारतामध्ये आज 1 हजार 650 राजकीय पक्ष आहेत, त्यापैकी केवळ भाजप आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष या दोघांतच अंतर्गत लोकशाही आहे. काही पक्षांमध्ये आजही घराणेशाही दिसून येते, असे सांगत शहा यांनी काँग्रेसवर टीका केली.

जातीयवादाविरोधात लढण्याचे सोडून भाजपने राष्ट्रपित्याचीच जात काढली. यातून भाजप आणि त्याच्या अध्यक्षांचे चारित्र्य दिसून येते. अशी मंडळी देशाला कोठे नेणार आहेत?
- रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्‍ते

Web Title: india news national news mahatma gandhi marathi news