पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाका : आचार्य धर्मेंद्र

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जून 2017

वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकण्यात यावा असे वक्तव्य विश्‍व हिंदू परिषदेचे नेते आचार्य धर्मेंद्र यांनी केले आहे.

जयपूर (राजस्थान) : वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाका, असे वक्तव्य विश्‍व हिंदू परिषदेचे नेते आचार्य धर्मेंद्र यांनी केले आहे.

कोटा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आचार्य धर्मेंद्र म्हणाले, "आशिया खंडात शांतता राखायची असेल तर पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकण्याची गरज आहे. पाकिस्तानला शेजारी देश म्हणण्याऐवजी शत्रूचा देश म्हणायला हवे.' यावेळी आचार्यांनी विविध विषयांवर मते मांडली. याबाबात "दैनिक जागरण' या हिंदी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.

भारतीय चलनावर असलेल्या महात्मा गांधी यांच्या छायाचित्रबद्दलही त्यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. मुस्लिम समाजाने बिनधास्तपणे "वंदे मातरम' म्हणावे असा सल्ला देत आचार्यांनी भारतामध्ये एपीजे अब्दुल कलाम आणि अशफाक उल्लाह खान यांच्यासारख्या देशभक्तांची अजिबात कमतरता नसल्याचे सांगितले.

Web Title: india news pakistan nuclear bomb marathi news Acharya Dharmendra terrorism