चिंताजनक ! कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत भारत आता चौथ्या स्थानावर

India At No. 4 On Global Coronavirus Chart Overtakes UK
India At No. 4 On Global Coronavirus Chart Overtakes UK

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव आता भारतात मोठ्या प्रमाणात वाढत असून गेले काही दिवस १० हजाराच्या जवळपास दररोज रुग्ण सापडत आहेत. रुग्णांच्या बाबतीत भारताची आकडेवारी चिंताजनक असून गेल्या २४ तासांमधील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता भारताने युनायटेड किंगडमला मागे टाकत सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या घरात पोहचली आहे. सध्या भारतातील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाख ९८ हजार २०५ इतकी झाली आहे. गेल्या आठवड्यात स्पेनला मागे टाकत भारत पाचव्या स्थानावर पोहचला होता. अमेरिका, ब्राझील, रशियामध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्येत सतत झपाट्याने वाढ होत आहे. आता भारत अमेरिका ब्राझील आणि रशियानंतर चौथ्या स्थानावर आहे.
--------
दिल्लीतील जामा मशिद 'या' तारखेपर्यंत बंदच 
--------
कोरोनावर औषध तयार; दहा देशांकडून औषधांची मागणी
--------
जगात सर्वात जास्त कोरोनाचा फटका हा अमेरिकेला बसला असून अमेरिकेत आतापर्यंत २० लाख ८९ हजार ७०१ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या देशात अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतील मृत्यूची संख्याही सर्वाधिक असून आतापर्यंत एक लाख १६ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझिलमध्ये ८ लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या रशियामध्ये पाच लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत.

दरम्यान, भारताच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सकाळी ९,९९६ नव्या रुग्णांची भर पडली असून सलग नवव्या दिवशी नऊ हजारहून अधिक रग्ण वाढले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण ८१०२ मृत्यू झाले असून गेल्या २४ तासांमध्ये एका दिवसातील सर्वात जास्त म्हणजे ३५७ मृत्यू नोंदवले गेले आहेत. भारतामध्ये एक लाख लोकसंख्येमागे ०.५९ मृत्यू झाले असून जगभरातील हे सर्वात कमी प्रमाण आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ४९.२१ टक्के झाले असून ते बुधवारी ४८.३७ टक्के होते. उपचाराधीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या गुरुवारीही जास्त होती. उपचाराधीन रुग्ण १.३७ लाख व बरे झालेले रुग्ण १.४१ लाख इतके आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com