भारत धर्मशाळा आहे का ? : रमणसिंग

वृत्तसंस्था
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

 40 लाख लोकांपैकी जे लोक भारताबाहेरून आले होते. अशा लोकांनी त्यांचे नागरिकत्व सिद्ध करून दाखवावे किंवा ज्या ठिकाणाहून ते येथे आले, त्याठिकाणी पुन्हा परत जावे, असेही रमणसिंग म्हणाले.  

रायपूर : 'नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनस्' (एनआरसी) मुद्यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, ''भारत धर्मशाळा नाही, की येथे कोणीही येऊन घुसखोरी करेल". 

दुर्ग येथे आयोजित पत्रकार परिषदेत रमणसिंग बोलत होते. ते म्हणाले, ''जे कोणी लोक देशाचे नागरिकत्व साध्य करून दाखवू शकत नाही. अशा लोकांनी देशात राहू नये. त्यांनी देश सोडून बाहेर जावे''. तसेच हा मुद्दा प्रचारित करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. आपला देश काय धर्मशाळा आहे का ? की भारताबाहेरील लोक येथे येऊन घुसखोरी करतात. भारतात कोणीही येऊन राहू शकते. अशा लोकांना बाहेर काढले पाहिजे. यातील काही लोकांची ओळख पटली असून, त्यातील काही आसाममध्ये वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे. 

दरम्यान, 40 लाख लोकांपैकी जे लोक भारताबाहेरून आले होते. अशा लोकांनी त्यांचे नागरिकत्व सिद्ध करून दाखवावे किंवा ज्या ठिकाणाहून ते येथे आले, त्याठिकाणी पुन्हा परत जावे, असेही रमणसिंग म्हणाले.  

Web Title: India Is Not Dharmashala says Raman Singh