चीनने पैंगोगच्या उत्तर भागात जे केलं, तेच भारताने दक्षिणेत करत दिलं प्रत्युत्तर

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 1 September 2020

पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पैंगोग त्सो सरोवराच्या Pangong Lake News उत्तर किनाऱ्यावर चीनने जे केले होते, भारताने त्याच्या या डावपेचाला दक्षिण किनाऱ्यावर प्रत्युत्तर दिलं आहे

नवी दिल्ली- पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पैंगोग त्सो सरोवराच्या Pangong Lake News उत्तर किनाऱ्यावर चीनने जे केले होते, भारताने त्याच्या या डावपेचाला दक्षिण किनाऱ्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. चीनने असा दावा केला आहे की, भारताने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे त्यांच्या प्रदेशाचा ताबा घेतला आहे आणि या प्रदेशातून भारतीय सैनिकांनी परत जावं, असं तो म्हणाला आहे.  (India-China Border Issue Latest News) विशेष म्हणजे पैंगोग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर म्हणजे फिंगर एरियामध्ये चीन अशाच प्रकारे भारतीय प्रदेशात तंबू ठोकून आहे. याच मुद्द्यावरुन गेल्या चार महिन्यांपासून उभय देशांमध्ये चर्चा सुरु आहे. 

काय सांगता! कोणतेही औषध न घेता HIV रुग्ण झाला बरा

पैंगोग सरोवराच्या दक्षिण भागातील डोंगरावरील भारतीय सैन्याच्या उपस्थितीवर चीनने आक्षेप घेतला आहे. तसेच भारताने हे सैन्य तात्काळ मागे घ्यावे, अशी चीनची मागणी आहे. मात्र, भारतीय लष्करातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, जोपर्यंत चीन एप्रिलमधील 'जैसे थे' स्थितीवर येत नाही, तोपर्यंत भारतीय सैना प्रत्येक ठिकाणी तैनात राहिल. सध्या चुशूलमध्ये भारत आणि चीनमध्ये कमांडर स्तरावरील चर्चा सुरु आहे. 

पैंगोगचा उत्तर किनारा आणि दक्षिण किनाऱ्यातील फरक

पैंगोग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर फिंगर एरिया आहे. फिंगर एरिया १ ते फिंगर एरिया ८ पर्यंतचा प्रदेश भारत आपला मानतो. फिंगर-४ पर्यंतचा भाग पूर्वीपासूनच भारताच्या ताब्यात आहे. मात्र, मे महिन्यातमध्ये चीनने फिंगर-४ पर्यंत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. चीनने फिंगर एरिया ५ ते फिंगर एरिया ८ मध्ये बांधकाम सुरु केले आहे. चीनने फिंगर एरिया ४ पर्यंत रस्ता बनवला आहे. सध्या फिंगर ४ मध्ये भारत-चीन एकमेकांसमोर आहेत. 

नऊ महिन्यांनी डॉक्टरची सुटका; ते हेट स्पीच नव्हे एकता वाढवणारे भाषण : HC

दोन दिवसांपूर्वी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने फिंगर ४ मध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. चीनचे सैनिक फिंगर ४ मधून हटले आहेत, पण येथे शिखरावर त्यांची अजूनही उपस्थिती आहे. या भागात शिखरांना अधिक महत्व आहे. कारण शिखरावरुन सर्व प्रदेशावर नजर ठेवता येते. २९ ऑगस्ट रोजी चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. शिवाय भारताने पैंगोग त्सो सरोवराच्या दक्षिण भागातील तीन डोंगरांवरही ताबा मिळवला. 

भारताने चीनला दिले जशासतसे उत्तर

भारताने तीन डोंगरांवर ताबा मिळवून चीनला जोरदार उत्तर दिल आहे. या डोंगराच्या शिखरावरुन चीनच्या हालचालींवर नजर ठेवता येणार आहे. या डोंगरांवर भारतही दावा सांगतो आणि चीनही. करारानुसार या भागात दोन्ही देश सैनिकांची तैनाती करत नाही, केवळ गस्त घालत असतात. पण, ज्याप्रमाणे चीन फिंगर एरियामध्ये आला आहे, त्याप्रमाणे भारताने पैंगोग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यात आपला तळ ठोकला आहे.  भारतीय लष्करातील एका अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्ही डिफेंसिव्ह पाऊल उचललं आहे. एप्रिल महिन्यामध्ये जशी स्थिती होती, तशी आम्हाला हवी आहे. आम्ही तणाव वाढवू इच्छित नाही.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Now In Control Of South Pangong After Chinese Build-Up