

Crude Oil Price Hike Hits India Oil Import Bill Jumps 60 Percent to 16 Billion Dollars as LPG Consumption Declines in October
sakal
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाच्या दरात वर्षभराच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढ झाल्याने भारताचे तेल आणि नैसर्गिक वायूचा निव्वळ आयात खर्च (इम्पोर्ट बिल) ऑक्टोबरमध्ये ६० टक्क्यांनी वाढून १६ अब्ज डॉलरवर पोहोचला. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारीतील पेट्रोलियम नियोजन आणि विश्लेषण कक्षाने (पीपीएसी) जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.