ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढतेय! चार दिवसात रुग्णसंख्या दुप्पट|India Omicron Cases | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

India Omicron Cases

ओमिक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढतेय! चार दिवसात रुग्णसंख्या दुप्पट

नवी दिल्ली : देशात ओमिक्रॉनचं संकट अधिकच गडद होताना दिसतंय. चार दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट झाली असून आज ओमिक्रॉनच्या रुग्णांचा आकडा २०० वर (India Omicron Cases) पोहोचला आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यानं आरोग्य विभागाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

हेही वाचा: ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास भारत सज्ज मनसुख: मंडाविया

गेल्या १७ डिसेंबरला ओमिक्रॉन रुग्णांची संख्या १०१ होती. त्यानंतर १९ डिसेंबरला त्यात भर पडून रुग्णसंख्या १२६ वर पोहोचली. सध्या देशात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या २०० वर पोहोचली असून सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली.

देशात जवळपास १५ दिवसांपूर्वी कर्नाटमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर महाराष्ट्रात देखील ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले. बघता बघता ओमिक्रॉनने तब्बल १२ राज्यांमध्ये शिरकाव केला असून महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. त्यापाठोपाठ तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थानचा क्रमांक लागतो. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

कोणत्या राज्यात किती रुग्ण -

 1. महाराष्ट्र - ५४

 2. दिल्ली - ५४

 3. तेलंगणा - २०

 4. कर्नाटक - १९

 5. राजस्थान - १८

 6. केरळ - १५

 7. गुजरात - १४

 8. उत्तर प्रदेश - २

 9. आंध्र प्रदेश - १

 10. चंदीगढ - १

 11. तमिळनाडू - १

 12. पश्चिम बंगाल - १

Web Title: India Omicron Cases Double In 4 Days

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :omicronOmicron Variant