आरोग्य मंत्री म्हणाले, ओमिक्रॉन समजू येईपर्यंत उशीर झालेला असेल

लवकरच कठोर पावले उचलली नाही, तर संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होईल
omicron
omicronomicron

लंडन : ब्रिटेनमध्ये कोरोनाचा (coronavirus) नवीन प्रकार ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. येथे ओमिक्रॉन (omicron variant) संक्रमणाचा दरही जास्त आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल आम्हाला अद्याप फारशी माहिती नाही आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यास कदाचित उशीर झाला आहे. व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, असे म्हणत ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद (Sajid Javid) यांनी ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्यासमोर पराभव स्वीकारला (Accepted defeat) आहे.

डब्लूआयओएनमध्ये प्रकाशित बातमीनुसार, आम्हाला ओमिक्रॉनकडे बारकाईने पाहावे लागेल. शास्त्रज्ञांना शक्य तितका वेळ मिळावा पाहिजे. जेणेकरून ते धोक्याचे मूल्यांकन करू शकतील आणि ते टाळण्यासाठी उपाय सुचवू शकतील. जेव्हा ओमिक्रॉन पूर्णपणे समजून येईल तोपर्यंत फार उशीर झालेला असेल, असे आरोग्य मंत्री साजिद जाविद (Sajid Javid) म्हणाले.

omicron
ख्रिसमसनंतर दोन आठवड्यांचा लॉकडाऊन; ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ

कोरोनाला सामोरे जाण्यासाठी संसदेत उभे राहून प्लॅन बी वर चर्चा करणे मला अजिबात आवडले नाही. कारण, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि संधींना प्रोत्साहन देणे हे माझ्या राजकारणात येण्याचे एक कारण आहे. सरकारने भूतकाळातील चुकांमधून शिकले पाहिजे. उशीर झाल्यानेच परिस्थिती आणखी बिघडली आणि संसर्गाची प्रकरणे वाढली. लवकरच कठोर पावले उचलली नाही, तर संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ होईल, असेही जाविद म्हणाले.

सात रुग्णांचा मृत्यू

ब्रिटेनमध्ये ओमिक्रॉनचा (omicron variant) प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. येथे दिवसात कोरोनाच्या नवीन प्रकाराची दहा हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जी या प्रकारातील दैनंदिन प्रकरणांची आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. ब्रिटेनमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनच्या एकूण २४,९६८ प्रकरणांची नोंद झाली आहे. देशात ओमिक्रॉनची लागण झालेल्या सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

omicron
क्षणाची हौस बेतली जीवावर; २१ वर्षीय तरुणीचा तडफडून मृत्यू

जे आवश्यक असेल ते आम्ही करू

सरकारने साथीच्या रोगाचा कसा सामना केला हे आम्ही यापूर्वी पाहिले आहे. वाढत्या प्रकरणांमुळे कडक लॉकडाऊन लागू करण्याच्या सरकारच्या योजनेवरील अहवालांचा हवाला देऊन जे आवश्यक असेल ते आम्ही करू, असे आरोग्य मंत्री साजिद जाविद (Sajid Javid) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com