India Operation Sindooresakal
देश
Operation Sindoor साठी पाकिस्तानातील सर्वात मोठे शहर असलेल्या 'बहावलपूर'चीच का निवड केली? लष्कर-जैशशी काय आहे कनेक्शन?
India targets Bahawalpur in Operation Sindoor : भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर रात्रभर चाललेल्या एका गोपनीय मोहिमेअंतर्गत (ऑपरेशन सिंदूर) मोठा हल्ला केला. पाकिस्ताननेही या हल्ल्याची कबुली दिली आहे.
Operation Sindoor Live Updates: भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर रात्रभर चाललेल्या एका गोपनीय मोहिमेअंतर्गत (ऑपरेशन सिंदूर) मोठा हल्ला केला. पाकिस्ताननेही या हल्ल्याची कबुली दिली आहे. त्यांनी म्हटलंय, की भारतानं कोटली, 'मुरिदके आणि बहावलपूर येथील नऊ ठिकाणांना लक्ष्य केलंय.' या ऑपरेशनचा मुख्य उद्देश जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या तळांचा नाश करणे हा होता. हे दोन्ही गट गेल्या तीन दशकांपासून भारतात मोठे दहशतवादी हल्ले करत आले आहेत.