esakal | भारत - पाकिस्तान सीमा लोकप्रिय पर्यटनाचे स्थळ म्हणून विकसित
sakal

बोलून बातमी शोधा

india pakistan border

भारत - पाकिस्तान सीमा लोकप्रिय पर्यटनाचे स्थळ म्हणून विकसित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : गुजरातमधील नादाबेट येथील भारत व पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमारेषा ही आता लोकप्रिय पर्यटनाचे स्थळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. सीमाभाग पर्यटन विकसित करण्याच्या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे देशातील नागरिकांना सीमाभागाविषयी माहिती जाणून घेण्याची आणि त्याचवेळी पर्यटनाचा आनंद मिळावा या अनुषंगाने हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे.

गुजरात पर्यटन महामंडळाच्या वतीने हा पर्यटन प्रकल्प राबविण्यात आला असून गेल्या दोन वर्षांपासून हे पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत नादाबेट येथील सीमाभागाच्या पाहणीचे कार्य डिसेंबर २०१६ रोजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केले होते. त्यानंतर या प्रकल्पाची सुरवात झाली. साधारणपणे तीन वर्षात या पर्यटनस्थळाचे काम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा: 'ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा मांडणार'

या ठिकाणी ‘टी जंक्शन’पासून ‘झीरो पॉईंट’पर्यंत रस्त्यावर एक व्यासपीठ उभारण्यात आले आहे. यावर विविध प्रकारचे क्षेपणास्त्र, टी-५५ रणगाडा, आर्टिलरी गन, टॉरपेडो आणि मिग-२७ विमाने प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली आहेत. यामुळे सीमा दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना लष्कर आणि संरक्षण दलाची सज्जता कशी असते, हे अनुभवता येत असल्याची माहिती गुजरात पर्यटन मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.

india pakistan border

india pakistan border

पर्यटन स्थळाचे वैशिष्ट्य

- नादाबेटला भेट देणाऱ्या पर्यटकांना सीमाभाग नीट पाहता यावा यासाठी इथे व्ह्यूइंग डेकही

- ‘रिट्रीट सोहळ्या’साठी इथे परेड ग्राउंडही आहे

- बीएसएफच्या जवनांद्वारे रिट्रीट सोहळा

- हुतात्मा सैनिकांच्या स्मरणार्थ इथे ‘अजय प्रहारी’ हे स्मारक उभारण्यात आले आहे

- स्मारकाला भेट देणाऱ्या पर्यटकांना येथे शहीदांना श्रद्धांजलीही वाहता येते

- सुंदर ‘म्युरल्स’ने सजलेले ३० फूट उंच टी जंक्शन हा आकर्षणाचा केंद्र

loading image
go to top