esakal | 'ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा मांडणार'; सोमय्यांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Untitled-1.jpg

जरंडेश्वर कारखान्याचे व्हॅल्युएशन कोणी केलं? असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे.

'ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा मांडणार'

sakal_logo
By
स्नेहल कदम

पुणे - मी आत्ता तिसऱ्या अनिलचा शोध घेत आहे. मी त्यासाठी पुण्यात आलो आहे. बजरंग खरमाटे यांच्या 40 मालमत्तांची यादी ईडीकडे दिली आहे. ठाकरे सरकार मधील आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा मांडणार आहे, असा इशारा भाजपाचे किरीट सोमय्या यांनी दिला आहे. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भावना गवळी यांनी बॅंकेतून काढलेल्या रकमेची स्लीप त्यांनी दाखवली.

हेही वाचा: महाराष्ट्र सदन प्रकरण : दोषमुक्त झाल्यावर भुजबळांची प्रतिक्रिया

यावेळी ते म्हणाले, बजरंग खरमाटे यांच्या 40 मालमत्तांची यादी ईडीकडे दिली आहे. ठाकरे सरकार मधील आणखी एका मंत्राचा घोटाळा मांडणार आहे. ही कारवाई पुढील दोन ते तीन आठवड्यात होणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले, अनिल परब यांचा रीसॉर्ट अनधिकृत असल्याचं मंत्रिमंडळाचं शपथपत्र दिलं आहे. यावेळी भावना गवळी यांच्यावरही त्यांनी आरोप केले. जरंडेश्वर कारखान्याचे व्हॅल्युएशन कोणी केलं? असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे. भावना गवळी यांनी घोटाळा केल्याचे पुरावे आहेत. त्यांना वाचवायचा असेल तर पवारांनी तसे सांगावे असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

loading image
go to top