India Pakistan nuclear strike preparation Shahbaz Sharif statement : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी शनिवारी पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केले आहे. इस्लामाबाद येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील सैन्य संघर्षाचाही उल्लेख केला. भारताच्या हल्ल्यात ५५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला असून पाकिस्ताननेही पूर्ण ताकदीने भारताला प्रत्युत्तर दिल्याचा दावा शरीफ यांनी केला.