India Pakistan War: भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये अमेरिकेच्या मध्यस्थीनं काही तासांपूर्वीच युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. पण या कराराच्या केवळ तीन तासांतच पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरु केले आहेत. सीमेवरील तीन राज्यांमध्ये पुन्हा पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरु झाले असून या ठिकाणी विविध शहरांमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आला आहे.