
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी सकाळी पाकिस्तानने पुन्हा ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. शस्त्रे, तोफा, ड्रोन तसेच राजनैतिक युद्धाच्या माध्यमातून भारत पाकिस्तानला पूर्णपणे पराभूत करत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार स्थगित केला होता. ९ मे रोजी सकाळी चिनाब नदीवर बांधलेल्या सलाल धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले.