इस्रो'ची भरारी; स्वदेशी अंतराळ स्थानक उभारणार

इस्रो'ची भरारी; स्वदेशी अंतराळ स्थानक उभारणार

नवी दिल्ली ः भारताने दुसरी "चांद्रयान-2' मोहीम हाती घेतली असून, 15 जुलै रोजी यान चंद्राकडे झेपावणार असल्याचे बुधवारी (ता.12) जाहीर केल्यानंतर आज लगेचच भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार असल्याची दुसरी मोठी घोषणा "इस्रो'चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी येथे जाहीर केली. 

डॉ. सिवन म्हणाले की, भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याची योजना आखत आहे. देशाचा महत्त्वाकांक्षी "गगनयान' मोहिमेचाच हा विस्तारित भाग आहे. मानवाला अंतराळात पाठविल्यानंतर "गगनयान' कार्यक्रम सुरू ठेवण्यात येणार असून, या अतंर्गत भारत स्वतःचे अंतराळ स्थानक तयार करण्याची योजना आखत आहे. "गगनयान'ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी केली होती. डिसेंबर 2021 पर्यंत मानवासहित अंतराळ मोहिमेचे भारताचे लक्ष्य आहे. जर हे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण झाले तर स्वतःच्या बळावर अंतराळवीरांना अंतराळ पाठविणारा भारत हा देशातील चौथा देश ठरेल. 

"भारताने 20 टनांचे अंतराळ स्थानक पाठविण्यासाठी 2030 हे वर्ष निश्‍चित केले आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणच्या प्रयोगासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. अंतराळवीरांना अंतराळात 15 ते 20 दिवस राहणे शक्‍य व्हावे यासाठी या स्थानकाचा मुख्य वापर होणार आहे. मात्र, याविषयाची अधिक माहिती "गगनयान' मोहिमेच्या पूर्णत्वानंतरच हाती येईल,'' असे सिवन यांनी सांगितले. आतापर्यंत अमेरिका, रशिया, चीन व काही देशांच्या समूहाने त्यांचे स्वतःचे अंतराळ स्थानक उभारलले आहे. 

केंद्रीय अणू ऊर्जामंत्री जितेंद्र सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत "गगनयान' मोहिमेची माहिती दिली. ते म्हणाले, ""2022 मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 75 वर्षानिमित्त गगनयान राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या निरीक्षणाखाली पहिली मानवी अंतराळ मोहीम हाती घेण्याचा संकल्प "इस्रो'ने केला आहे. याच्या तयारीसाठी विशेष कक्षाची स्थापना केली आहे. या मोहिमेतून 2-3 अंतराळवीरांना अंतराळात पाठविण्यात येणार आहे. यासाठी सुमारे दहा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.'' 

"गगनयान' मोहिमेचे वैशिष्ट 
- संपूर्ण स्वदेशी बनावट 
- कोणत्याही देशाचे सहकार्य नाही 
- "गगनयान'साठी दहा हजार कोटींची तरतूद 
- मानवसहित मोहिमेपूर्वी श्रीहरीकोटा येथून मानवविरहित दोन उड्डाणे होणार 
- अंतराळवीरांना अंतराळात राहण्यासाठी स्थानकाचा वापर 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com