India Polymer Currency Notes
esakal
भारतातील चलन व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक १० आणि २० रुपयांच्या पॉलीमर अर्थात प्लास्टिकच्या नोटांसाठी पायलट प्रकल्प राबवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या नोटा सध्याच्या कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ, सुरक्षित आणि दीर्घकाळ वापरता येण्यासारख्या असतील, असा दावा केला जातो आहे. दरम्यान, प्लास्टिकच्या नोटा आल्यावर सध्या वापरात असलेल्या कागदी नोटांचं काय होणार? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.