पाकच्या निर्णयाचा भारताकडून निषेध

वृत्तसंस्था
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली - इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्याला परत पाठविण्याच्या निर्णयाचा निषेध नोंदविताना भारताने कठोर शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. या कारवामुळे पाकिस्तान सीमेपलीकडील दहशतवादासह सातत्याने भारतविरोधी पवित्रा धारण करत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट होते, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

भारताने काल पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्याची हेरगिरीप्रकरणी चौकशी करताना तिघांना अटक केली होती. त्यानंतर या कर्मचाऱ्यास देश सोडून जाण्याचाही आदेश देण्यात आला होता. मात्र पाकिस्ताननेही तातडीने भारतीय उच्चायुक्तालयातील सुरजित सिंह यांना देशात राहण्यास अयोग्य व्यक्ती जाहीर करताना, भारतात परत जाण्याचे आदेश दिले.

यावर बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप म्हणाले, की कर्मचाऱ्याला परत पाठविण्याच्या निर्णयाविषयी पाकिस्तानकडून कोणतेही सबळ स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पाकची कारवाई आधारहीन आणि राजनैतिक शिष्टाचाराला धरून नाही. सुरजित सिंह हे भारतीय उच्चायुक्तालयात सहायक मनुष्यबळ आणि कल्याण अधिकारी म्हणून काम करतात.

Web Title: India protested Pakistan's decision