
India Saudi Relations
Sakal
नवी दिल्ली : सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संरक्षण कराराच्या पार्श्वभूमीवर भारताने सौदी अरेबियाला धोरणात्मक भागीदारी, हितसंबंध आणि भारताची संवेदनशीलता लक्षात घ्यावी, असे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे, इराणमधील चाबहार बंदर प्रकल्पाला लागू असलेली निर्बंध सवलत रद्द करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे परिणाम भारतातर्फे तपासून पाहिले जाणार आहेत.