
नवी दिल्ली : जागतिक स्तरावर उत्पन्न समानतेमध्ये भारताने चौथे स्थान पटकावले आहे. सर्वाधिक समानता असलेला देश म्हणून भारत उदयास येत आहे, विशेषतः भारताचे आकारमान आणि वैविध्यतेच्या पार्श्वभूमीवर ही कामगिरी उल्लेखनीय आहे. गिनी निर्देशांकात भारताने २५.५ गुण मिळवत आघाडी घेतल्याचे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे.