Coronavirus : २४ तासांत ९०९ नव्या केसेस; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव म्हणाले...!

Lav-Agarwal-Health-Ministry
Lav-Agarwal-Health-Ministry

नवी दिल्ली : गेल्या २४ तासात देशातील १,८६,९०६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४.३ टक्के लोक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. जगभरातील अनेक देशांना कोरोनाने विळखा टाकला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी देशाने विविध पावले उचलली आहेत.

कोरोना विरुद्धच्या लढाईत सर्व सरकारी यंत्रणा उतरल्या असून खासगी क्षेत्रातील अनेकांचे त्यांना सहकार्य मिळत आहे. तसेच देशभरातील नागरिकांचेही मोलाचे सहकार्य मिळत आहे. मात्र, देशभरातील सर्व नागरिकांनी अजून काही दिवस असेच सहकार्य करावे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचेही पालन करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अगरवाल यांनी केले. 

२४ तासांत ९०९ नव्या केसेस 

गेल्या २४ तासांमध्ये ९०९ नव्या केसेस समोर आल्या आहेत. त्यामुळे देशभरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८३५६ एवढी झाली आहे. तर २७३ लोकांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत ७१६ लोकांनी कोरोनाचा यशस्वी मुकाबला केला असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात ७४ लोक बरे झाले असून त्यांचे रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत.

तपासणी करण्यावर भर

सध्या सरकार आरोग्य तपासणी करण्यावर भर देत असून त्यासाठी देशभरातील १४ संस्थांवर ही जबाबदारी सोपवली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे वैद्यकीय व्यवस्थापन आणि अंमलबजावणीवर सध्या जोर दिला जात आहे. जवळपास ८० टक्के कोरोना पॉझिटिव्ह केसेसवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत. तर गंभीर परिस्थिती असणाऱ्या रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात येत आहे. 

इतर देशांच्या तुलनेत एक पाऊल पुढेच

देशभरात २९ मार्चपर्यंत ९७९ कोरोना पॉझिटिव्ह केसेस होत्या, त्या आता ८०००च्या पुढे गेल्या आहेत. यापैकी २० टक्के म्हणजे १६७१ रुग्णांना आयसीयूत भरती करण्यात आले आहे. २९ मार्चला देशभरातील १६३ हॉस्पिटलमध्ये ४१९०० बेड उपलब्ध होते. तर आज ६०२ हॉस्पिटलमध्ये जवळपास १ लाख ५ हजार बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. 

केरळमध्ये ९५०, अहमदाबादमध्ये १२००, कटकमध्ये १५०, मुंबईत ७०० बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. खासगी हॉस्पिटलपैकी अपोलोमध्ये ४ टेस्टिंग लॅब आणि ४०० बेड, मॅक्स हॉस्पिटलमध्ये २०० बेड उपलब्ध केले आहेत. तर मिलिटरीतर्फे ९ हजार बेड उपलब्ध करण्यात आले असून त्यात आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती अगरवाल यांनी दिली. 

दररोज होतात १६ हजार टेस्ट 

आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात १२९ टेस्टिंग फॅसिलिटी सेंटर आहेत. या सर्व सेंटरमध्ये आज दुपारी २ वाजेपर्यंत १,८६,९०६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्यांपैकी ७९५३ म्हणजे ४.३ टक्के केसेस या कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. गेल्या पाच दिवसांपासून दिवसभरात १६ हजारहून जास्त टेस्ट केल्या जात आहेत. त्यामध्ये सरासरी ५८४ केसेस या पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

सायबर क्राईमबाबत जागरूक राहा

गृह मंत्रालयातर्फेही नागरिकांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे सायबर क्राईममध्ये वाढ झाली आहे. त्यासाठी गृह मंत्रालयाने 'सायबर मित्र' हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून cybercrime.gov.in या संकेतस्थळावर सायबर क्राईमबाबत तक्रार दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

५००० ट्रेन कोचमध्ये तयार केले आयसोलेशन वॉर्ड

कोरोनाचा सामना करण्यासाठी ऑर्डिनन्स फॅक्टरीतर्फे अरुणाचल प्रदेशमध्ये ५० तंबूंची उभारणी करण्यात आली आहे. एका तंबूत २ रुग्णांवर उपचार करता येईल, अशी याची उभारणी करण्यात आली आहे. एचएएल कंपनीने बंगळूरूमध्ये ५००० ट्रेन कोचचे रुपांतर आयसोलेशन वॉर्डमध्ये केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com