esakal | कोरोना लसीकरणात भारताचा रेकॉर्ड; एका दिवसात तब्बल इतक्या लोकांना लस
sakal

बोलून बातमी शोधा

corona_20vaccine_20centres

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक या सहा राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे

कोरोना लसीकरणात भारताचा रेकॉर्ड; एका दिवसात तब्बल इतक्या लोकांना लस

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडू, गुजरात, कर्नाटक या सहा राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या सहा राज्यांमध्ये एकूण 85 टक्के रुग्ण संख्या आहे. असे असताना देशात लसीकरणाचा मोहीमेने देखील गती घेतली आहे. देशात 16 जानेवारीला लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. शिवाय 1 मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला. गुरुवारचा (4 मार्च)  दिवस लसीकरणासाठी खास राहिला. गुरुवारी देशात 10 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. हा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. 16 जानेवारीला सुरु झालेल्या लसीकरणामध्ये आतापर्यंत देशातील 1.77 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामुळे देशात लसीकरणाला गती आल्याचं दिसतंय.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार देशात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु झाले आहे. यात 10 हजार सरकारी सेंटरचा समावेश आहे. याशिवाय खासगी हॉस्पिटलमध्येही लसीकरण करण्यात येत आहे.  खासगी रुग्णालयात 250 रुपयांना कोरोनाची लस मिळत आहे. प्रायव्हेट आणि सरकारी भागिदारीमुळे गुरुवारी लसीकरणाचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित झाला आहे. देशात तब्बल 10 लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली. सध्या वयस्कर आणि गंभीर आजार असणाऱ्या 45 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यानंतर तरुणांना लस देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Corona: मॉल्स, रेस्तराँ आणि धार्मिक स्थळांसाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

देशात दोन लशींच्या वापराला मंजुरी देण्यात आली आहे. यात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीचा समावेश आहे.  लोकांना या दोन्ही लशींचा डोस देण्यात येत आहे. त्यांना या दोन लशींपैकी एक लस निवडण्याचा पर्याय देण्यात आलेला नाही. दोन दिवसांपूर्वी भारत बायोटेकने कोवॅक्सिन लस 85 टक्के प्रभावी असल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मार्च रोजी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्यातील पहिली लस घेतली होती. त्यानंतर देशातील अनेक मान्यवरांनी कोरोनाची लस घेतली आहे. 

Corona : अँजेला मर्केल यांच्या मॅरेथॉन बैठका; जर्मनीत 28 तारखेपर्यंत वाढवला...

दरम्यान, भारतात गुरुवारी 17,407 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 14,031 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.  गुरुवारी 7,75,631 चाचण्या करण्यात आल्या आहेत. या नव्या चाचण्यांसह देशातील एकूण आजवरच्या चाचण्यांची संख्या ही 21,91,78,908 वर पोहोचली आहे. याबाबतची माहिती Indian Council of Medical Research (ICMR) ने दिली आहे. 
 

loading image
go to top