'मोदी सरकारने तयार केलेल्या आपत्तीमुळे देश आर्थिक संकटात'

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 2 September 2020

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच देश आर्थिक संकटात सापडला आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधलाय. आपल्या ट्विटमधून त्यांनी 5 मुद्दे आधोरेखित करत देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या संकटजन्य परिस्थितीनंतर देशासमोर आता मोठे आर्थिक संकट उभारले आहे. 'सकल राष्ट्रीय उत्पादन' (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) अर्थात जीडीपी -23 टक्के इतक्या निच्चतम पातळीवर पोहचला आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच देश आर्थिक संकटात सापडला आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधलाय. आपल्या ट्विटमधून त्यांनी 5 मुद्दे आधोरेखित करत देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेला मोदी सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 

सिब्बल-गुलाब नबी आझाद यांनी आता भाजपात प्रवेश करावा, आठवलेंचा सल्ला

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच जीडीपी -23 टक्के  इतका निच्चमत नोंदवला गेलाय.  45 वर्षांत सर्वात मोठी बेरोजगारीची लाट उसळली आहे. 12 कोटी रोगगार गमावले आहेत. सध्याच्या परिस्थितीत राज्यांना जीएसटीची रक्कम देणे गरजेचे आहे. 2019 ते  2020 या काळातील वस्तू व सेवा कराची (जीएसटी) राज्यांना देण्याची रक्कम केंद्र सरकारकडे थकीत आहे. दिवसागणिक देशातील कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जगातील इतर देशांच्या तुलनेत देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. सीमारेषेवर तणावाची परिस्थिती असून या सर्व पातळीवर मोदी सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. 

"यूएईने मुस्लिम जगताचा विश्वासघात केला"

यापूर्वी राहुल गांधी यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून 'अर्थव्यवस्था की बात' या शिर्षकाखाली मोदी सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. भारतीय अर्थव्यवस्था 40 वर्षांत पहिल्यांदाचा मंदीच्या अवस्थेत पोहचली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी 2008 च्या वैश्विक मंदीचा दाखला दिला होता. अमेरिका आणि युरोपात बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यात युपीए सरकार यशस्वी ठरले होते, असे राहुल गांधींनी या व्हिडिओत म्हटले होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India is reeling under Modi made disasters says Congress Leader Raul Gandhi