
नवी दिल्ली : ‘अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराच्या अनुषंगाने भारत कोणत्याही प्रकारचा दबाव मान्य करणार नाही,’ अशी ठाम भूमिका केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी घेतली आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसने मात्र गोयल यांनी कितीही छाती बडवली तरी पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निश्चित केलेल्या अंतिम मुदतीपुढे झुकल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोला लगावला.