esakal | India:‘रिलायन्स’ देशातील ‘बेस्ट एम्प्लॉयर’
sakal

बोलून बातमी शोधा

Mukesh ambani

‘रिलायन्स’ देशातील ‘बेस्ट एम्प्लॉयर’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : जगातील सर्वोत्तम एम्प्लॉयर २०२१ ची वार्षिक यादी ‘फोर्ब्स’ने जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी कर्मचारी नियुक्तीच्या दृष्टिने भारतातील सर्वोत्तम ठरली असून ती प्रथम स्थानावर आहे. जागतिक पातळीवर रिलायन्सचा ५२ वा क्रमांक आहे. या यादीमध्ये ७५० बहुराष्ट्रीय आणि मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. देशातील एकूण १९ कंपन्यांनी या यादीत स्थान मिळवले आहे.

जागतिक पातळीवर दक्षिण कोरियाच्या सॅमसंग कंपनीने जगातील सर्वोत्तम ‘एम्प्लॉयर’ होण्याचा मान मिळविला आहे. दुसऱ्या ते सातव्या स्थानावर आयबीएम, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, ॲपल, अल्फाबेट आणि डेल या अमेरिकी कंपन्यांचे वर्चस्व आहे. स्टॅटिस्टा या बाजारपेठ संशोधन संस्थेच्या मदतीने ‘फोर्ब्स’ने ही वार्षिक यादी तयार केली आहे.

हेही वाचा: प्रा. राजन शिंदे खून प्रकरण : ‘एसआयटी’चे पथक देऊळगाव राजाला रवाना

भारतातील उत्कृष्ट ‘एम्प्लॉयर’ कंपन्या व जागतिक पातळीवरील क्रमांक ः रिलायन्स इंडस्ट्रिज ः ५२, आयसीआयसीआय बँक ः ६५, एचडीएफसी बँक ः ७७, एचसीएल टेक्नॉलॉजिस ः ९०, स्टे बँक ऑफ इंडिया ः ११९, लार्सन अँड टुर्ब्रो ः १२७, बजाज ः २१५, ॲक्सिस बँक ः २५४, इंडियन बँक ः ३१४, ऑइल अँड नॅचरल गॅस ः ४०४, आमारा राजा ग्रुप ः ४०५, कोटक महिंद्रा बँक ः ४१८, बँक ऑफ इंडिया ः ४५१, आयटीसी ः ४५३, सिप्ला ः ४६०, बँक ऑफ बडोदा ः ४९६, भारतीय आयुर्विमा महामंडळ ः ५०४, इन्फोसिस ः ५८८, टाटा समूह ः ७४६

loading image
go to top