Corona virus: देशात गेल्या २४ तासांत 4,518 नवे रुग्ण, ९ जणांचा मृत्यू

भारतात कोरोना (Corona) संसर्गात पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं दिसून येत आहे.
Corona Patient Updates in India
Corona Patient Updates in India esakal

कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. भारतात कोरोना (Corona) संसर्गात पुन्हा एकदा वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 4,518 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

सरकारी आकड्यांच्या माहितीनुसार देशात एकुण अॅक्टिव्ह रुग्णांची संध्या 25,782 इतकी आहे. तर गेल्या २४ तासांत 2,779 जणांची प्रकृती बरी झाली असून आत्तापर्यंत 42,630,852 जणांनी कोरोनावर मात केली आहे.(Corona Patient Updates in India)

तसेच आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे 524,701 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण, 43,181.335 जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे.

देशात कोरोनाची चौथी लाट येण्याचा धोका आरोग्य तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. दिल्लीत रविवारी 1.91 टक्के पॉझिटिव्ह दरासह 343 नवीन कोरोना प्रकरणं नोंदवली गेली आहेत. कर्नाटकात रविवारी 301 नवीन रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 1 हजार 494 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी 614 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77 लाख 38 हजार 564 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.04% एवढे झाले आहे.

राज्यात आज 1494 नवीन रुग्णांचे निदान झालेय. तर एका रुग्णाचा मृत्यू झालाय. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के एवढा आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजार 767 इतकी झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com