esakal | Corona Update: महाराष्ट्रात 4 दिवसांपासून 8 हजारांपेक्षा अधिक, तर देशात 24 तासांत 16 हजार रुग्ण

बोलून बातमी शोधा

corona report}

कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16,738 ने वाढली आहे

Corona Update: महाराष्ट्रात 4 दिवसांपासून 8 हजारांपेक्षा अधिक, तर देशात 24 तासांत 16 हजार रुग्ण
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16,738 ने वाढली आहे, तर मंगळवारी 11,799  रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 138 लोकांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंबंधीची आकडेवारी जारी केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्रात मंगळावारी जवळ 9 हजारांच्याजवळ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या सलग चार दिवसांपासून महाराष्ट्रात 8 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.  त्यामुळे राज्यासाठी चिंता वाढली आहे.

आतापर्यंत देशात 1,10,46,914 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत  1,07,38,501 लोकांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. भारतात कोरोना मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. देशात आतापर्यंत 1,56,705 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या काही दिवसांपासून 2 लाखांपेक्षा कमी आहे. देशात सध्या 1,51,708  कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. 

एकटेपणा दूर करण्यासाठी जपानमध्ये मंत्र्याची नियुक्ती; का उचलावं लागलं असं पाऊल?

देशात 16 जानेवारीला लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोना लस दिली जात आहे. आतापर्यंत 1 कोटी 25 लाखांच्या आसपास लशीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 40 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण 1 मार्चपासून सुरु होत आहे. देशात आतापर्यंत 21,38,29,658 लोकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मंगळवारी 7,93,383 लोकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

1 मार्चपासून कोणाला मिळणार कोरोना लस? जाणून घ्या रजिस्ट्रेशनची संपूर्ण प्रक्रिया

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, मधुमेहासारखे गंभीर आजार असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येईल. दहा हजार सरकारी आणि २० हजार खासगी लसीकरण केंद्रांमार्फत ही मोहीम राबविली जाणार असून सरकारी केंद्रांवर नागरिकांना ही लस मोफत मिळेल.  खासगी केंद्रांवर मात्र लसीकरणाचे शुल्क द्यावे लागेल. हे शुल्क नेमके किती असेल याबाबत निर्माते आणि रुग्णालयांशी चर्चा करून आरोग्य मंत्रालयातर्फे येत्या तीन ते चार दिवसांत कळविले जाईल, असे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.