
"ही आमची अंतर्गत समस्या", मोहम्मद झुबेरच्या अटकेवर भारताचे जर्मनीला प्रत्युत्तर
नवी दिल्ली : अल्ट न्यूज (Alt News) या फॅक्ट-चेक वेबसाइटचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर (Mohammed Zubair) यांच्या अटकेबाबत जर्मन परराष्ट्र मंत्रालयाच्या (German Foreign Ministry) टिप्पणीवर भारताने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारत (India) सरकारने ही घटना अंतर्गत समस्या असल्याचे म्हटले आहे. तसेच सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करण्याची गरज नसल्याचेही स्पष्ट केले आहे. हा आमचा अंतर्गत प्रश्न असून, हे प्रकरण न्यायालयात सुरू असून, आमची कायदेशीर व्यवस्था स्वतंत्र आहे आणि सध्या यावर कोणतीही टिप्पणी निरुपयोगी असेल अशा ठाम शद्बांत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी जपानला उत्तर दिले आहे. (Mohammed Zubair News In Marathi)
हेही वाचा: BREAKING: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळीबार
मोहम्मद झुबेरच्या अटकेवर जर्मन परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकारांनी (Journalist) जे बोलले आणि लिहिले त्याबद्दल त्यांचा छळ केला जाऊ नये आणि त्यांना तुरुंगात टाकले जाऊ नये असे विधान केले होते. तसेच आम्हाला या विशिष्ट प्रकरणाची जाणीव आहे आणि आमचा नवी दिल्लीतील दूतावास त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. "भारत स्वत:ला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखतो. त्यामुळे तेथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रेसचे स्वातंत्र्य या लोकशाही मूल्यांना आवश्यक स्थान दिले जाईल, अशी अपेक्षा केली जाऊ शकते." असेदेखील म्हटले होते.
हेही वाचा: तर बाळासाहेबही म्हटले असते, "व्वा रे माझ्या मर्दांनो"; सेनेने बंडखोरांना सुनावलं!
फॅक्ट-चेक वेबसाइट ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना 2018 मध्ये एका वादग्रस्त ट्विटसाठी 27 जून रोजी अटक करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्येही झुबेरवर एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. 4 जुलै रोजी मोहम्मद जुबेरला दिल्ली पोलिसांनी सीतापूर येथील न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने जुबेरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मोहम्मद झुबेर 27 जूनपासून दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असून, सुप्रीम कोर्टात उद्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
Web Title: India Responded To Germany On The Arrest Of Mohammad Zubair
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..