तर बाळासाहेबही म्हटले असते, "व्वा रे माझ्या मर्दांनो"; सेनेने बंडखोरांना सुनावलं! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

तर बाळासाहेबही म्हटले असते, "व्वा रे माझ्या मर्दांनो"; सेनेने बंडखोरांना सुनावलं!

मुंबई : स्वतःस बंडखोर म्हणवून घेणाऱया आमदारांनी कधी या पर्यायाचा विचार केला आहे काय? ‘‘चला साहेब, आता पुरे झाले. हे महाविकास आघाडीचे सरकार थांबवा. आपण बाहेर पडू व स्वबळावर हिंदुत्वाचे सरकार आणू. तोपर्यंत वाटल्यास विरोधी पक्षात बसू!’’ अशी भूमिका या तथाकथित हिंदुत्ववादी बंडखोर आमदारांनी घेतली असती तर त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) ‘व्वा रे माझ्या मर्दांनो!’ असे बोलून पाठच थोपटली असती. पण यापैकी काहीच घडले नाही. असे म्हणत बंडखोर आमदरांवर (Rebel MLA) सामना वृतपत्राच्या अग्रलेखातून भाजप आणि बंडखोर आमदारांवर करण्यात आला आहे. (Sivsena Attack on BJP From Samana Editorial )

हेही वाचा: कोकण, घाटमाथ्यावर जोर कायम; धरण क्षेत्रात पाऊस वाढला

भाजपला शिवसेनेचा पराभव करायचा नसून शिवसेना संपवायची आहे व पाहुण्याच्या चपलेने विंचू मारायचा आहे. पण विंचवाचा डंख व विष जहाल असते. इंगळी डसली की काय होते ते डोंगर-झुडुपातले राजकारण करणाऱयांना समजते. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने उघडेच असतात व बाहेर चपलांचे ढिगारे वाढतच आहेत. या वैभवाशी कसा सामना करणार? असाही प्रश्नही विचारण्यात आला आहे.

‘मातोश्री’ची (Matoshree) परंपरा व संस्कार असा आहे की तेथे सगळय़ांचाच सन्मान होतो. दरवाजे उघडेच असतात व दाराबाहेरील चपलांचे ढिगारे हेच ‘मातोश्री’चे वैभव आणि श्रीमंती आहे. हे जे काही कथित बंड वगैरे झाले त्याच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे एका तळमळीने आवाहन करीत आहेत की, ‘‘शिवसेना हे कुटुंब आहे. मातोश्री तुमचे हक्काचे घर आहे. परत फिरा. घरी या!’’ यापेक्षा सन्मानाने बोलविण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे काय? असा भावनिक प्रश्नदेखील यामध्ये उपस्थित करण्यात आला आहे.

हेही वाचा: शिक्षण नोकरीपुरतेच मर्यादित; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खंत

मातोश्री आहे. परत फिरा. घरी या!’’ यापेक्षा सन्मानाने बोलविण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे काय? भारतीय जनता पक्षाच्या फडणवीस सरकारात असताना आजच्या मुख्यमंत्र्यांनी ‘शिवसैनिकांवर अत्याचार होत आहेत, शिवसेनेच्या मंत्र्यांना मान-सन्मान मिळत नाही. निधीवाटपात वाटा नाही,’ असा जाहीर त्रागा करून मंत्रीपदाचा राजीनामाच दिला होता. तेव्हा भाजपला (BJP) जी दूषणे दिली तीच आता इतरांना दिली जात आहेत.

गेल्या अडीच वर्षांत हिंदुत्वाशी शिवसेनेने किंवा नेत्यांनी तडजोड केल्याचे एकतरी उदाहरण दाखवावे. पैगंबर साहेबांच्याबाबत अपशब्द उच्चारल्यावर भारतीय जनता पक्षालाही नुपूर शर्मांपासून हात झटकावे लागले. तिला पक्षातून काढावे लागले. येथे भाजपने हिंदुत्व धोक्यात आल्याची आरोळी ठोकली नाही असा हल्लाही शिवसेनेनने (Shivsena) भाजपवर केला आहे.

Web Title: Shivsena Attack On Rebel Mla From Samana Editorial

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..