India Responds To US Claim On 30-Day Waiver For Russian Oil
esakal
भारताला रशियाकडून तेल आयात करण्यासाठी एक महिन्याची सूट देण्यात आल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला होता. या दाव्यानंतर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यावर आता भारत सरकारने अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी भारताला कोणत्याही देशाच्या परवानगीची आवश्यकता नसल्याचे सरकारने ठामपणे सांगितले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.