
India Responds Strongly to Trump Tariff announcement: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावला आहे. याआधीही अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला होता. त्यामुळे आता भारतावर एकूण ५० टक्के टॅरिफ लावला गेला आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय खरोखरच धक्कादायक आहे.
तर ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफची घोषणा केल्यानंतर, आता भारताकडूनही अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. शिवाय, भारताने स्पष्टपणे म्हटलं आहे की, आम्ही आमची भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे आणि ट्रम्प यांच्या निर्णयाला दुर्दैवी असंही संबोधलं आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. ज्यात म्हटले आहे की, ''अलिकडच्या काळात, अमेरिकेने रशियाकडून भारताच्या तेल आयातीला लक्ष्य केले आहे. खरंतर आम्ही या मुद्द्यांवर आमची भूमिका आधीच स्पष्ट केलेली आहे, ज्यामध्ये आमची आयात बाजारपेठेच्या घटकांवर आधारित आहे आणि भारताच्या १.४ अब्ज लोकांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या एकूण उद्देशाने केली जाते.''
तसेच ''म्हणूनच, हे अत्यंत दुर्दैवी आहे की, अमेरिकेने भारतावर त्या कृतींसाठी अतिरिक्त कर लावण्याचा पर्याय निवडला आहे, जे अनेक अन्य देश आपल्या राष्ट्रीय हितासाठी करत आहेत. आम्ही पुन्हा सांगतो की ही कृती अन्याय्य, अनुचित आणि अविवेकपूर्ण आहे. भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल.'' असंही भारताने स्पष्ट केलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून सातत्याने, धक्कादायक विधानं करत आहेत. शिवाय भारताला लक्ष्य करत होते. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत आहे आणि नंतर त्या तेलाचा मोठा भाग आंतरराष्ट्रीय बाजारात चढ्या किमतीत विकून मोठा नफा कमवत आहे. असा आरोप ट्रम्प यांनी केलेला आहे. शिवाय, आपण भारतावरली टॅरिफ वाढणार असल्याची धमकीही त्यांनी आधीच दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.