Coronavirus : कोरोनाला तोंड देण्यासाठी आपण किती तयार? जाणून घ्या 10 मोठ्या गोष्टी

सध्या भारतातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. इतर अनेक देशांमध्ये विशेषतः चीनमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत.
Coronavirus Mock Drills
Coronavirus Mock Drillsesakal
Summary

सध्या भारतातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. इतर अनेक देशांमध्ये विशेषतः चीनमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत.

Coronavirus Mock Drills 10 Points : कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी देशात आरोग्य सुविधा किती सज्ज आहे, हे तपासण्यासाठी भारत मॉक ड्रिल आयोजित करण्याची तयारी करत आहे. या मॉक ड्रीलमध्ये सर्व राज्यांचे आरोग्य मंत्री सहभागी होणार आहेत.

सध्या भारतातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. इतर अनेक देशांमध्ये विशेषतः चीनमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. कोरोनाची तयारी तपासण्यासाठी अनेक टप्प्यांपैकी एका टप्प्यात आज देशभरातील रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये मॉक ड्रील होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी गेल्या आठवड्यात ही घोषणा केली होती.

Coronavirus Mock Drills
Coronavirus News: चीनला जाताय? मग, परदेशी प्रवाशांबाबत जिनपिंग सरकारनं घेतलाय मोठा निर्णय; जाणून घ्या कोणता?

चला जाणून घेऊया 10 मोठ्या गोष्टी

  • 1. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं शनिवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना काही देशांमध्ये कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं पाहिल्यानंतर, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक सार्वजनिक आरोग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

  • 2. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, आज 27 डिसेंबर रोजी देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये कोविड व्यवस्थापनासाठी रुग्णालयांची तयारी तपासण्यासाठी मॉक ड्रील घेण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 3. मॉक ड्रिलमध्ये आयसोलेशन बेडची क्षमता, ऑक्सिजन सपोर्टेड बेड, ICU बेड, डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिक्स, आयुष डॉक्टर्स, आशा आणि अंगणवाडी सेविक यांसारख्या आघाडीच्या कर्मचाऱ्यांची उपलब्धता यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित केलं जाईल.

  • 4. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आज (मंगळवार) दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात मॉक ड्रीलची पाहणी करतील.

  • 5. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) सदस्य आणि देशातील सर्व प्रमुख डॉक्टरांशी कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा केली.

Coronavirus Mock Drills
Odisha : हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून रशियाच्या सर्वात श्रीमंत नेत्याचा मृत्यू; पुतिन यांच्या पक्षाचे होते खासदार
  • 6. कोरोना प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी, त्यांची तयारी तपासण्यासाठी दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी सर्व सरकारी रुग्णालयांना भेटी देण्यास सुरुवात केलीये.

  • 7. दिल्ली सरकारनं कोविडचा सामना करण्याच्या तयारीचा भाग म्हणून रुग्णालयांसाठी औषधं खरेदी करण्यासाठी 104 कोटी रुपयांचं बजेट मंजूर केलं आहे. महाराष्ट्र सरकार देखील कोविड नियंत्रणासाठी उपाययोजना करत आहे.

  • 8. कर्नाटक राज्यानं सोमवारी सिनेमागृहे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मास्क वापरण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर पब आणि बारमध्ये प्रवेशासाठी लसीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे.

  • 9. तामिळनाडूचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम यांनी लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिलाय.

  • 10. पश्चिम बंगाल सरकारकडून ऑक्सिजन क्षमता, चाचणी आणि आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष केंद्रित करून योजना तयार केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com