COVID-19 : देशात कोरोनाचा आकडा ६ हजार पार, केरळात चिंताजनक स्थिती
COVID-19 India : देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत असून सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजारांच्या पुढे गेली आहे. केंद्र सरकारने राज्यांना सज्जतेचे आदेश दिले असून सर्व सुविधा तपासण्यास सांगितले आहे.
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाचा वेग वाढू लागला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजारांचा टप्पा पार करत असताना, मागील २४ तासांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.