esakal | भारताचं फायटर विमान 'तेजस'ला अमेरिकन इंजिनचं बळ
sakal

बोलून बातमी शोधा

Tejas fighter jet

भारताचं फायटर विमान 'तेजस'ला अमेरिकन इंजिनचं बळ

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: भारत अमेरिकेबरोबर लवकरच एक नवीन मोठा संरक्षण साहित्य खरेदी (defence deal) करार करणार आहे. या करारातंर्गत भारत फायटर विमानांसाठी (fighter jet) इंजिनची खरेदी करणार आहे. ७० कोटी डॉलर्सचा हा व्यवहार (business) आहे. या व्यवहाराची बोलणी जवळपास पूर्ण झाली आहेत. स्वदेशी बनावटीच्या 'तेजस' (tejas) फायटर विमानामध्ये ही अमेरिकन इंजिन्स बसवण्यात येतील. (India set to ink $700 mn fighter jet engine deal with US soon for tejas fighter jet)

तेजसच्या LCA Mk1A व्हर्जनसाठी इंडियन एअर फोर्स जनरल इलेक्ट्रीककडून ही इंजिन्स विकत घेणार आहे. पुरवठ्यासंबंधीचे मुद्दा मार्गी लागला आहे. भारत लवकरच १०० GE 404 इंजिनसाठी मागणी नोंदवणार आहे. इकोनॉमिक्स टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: पोलिस आयुक्तांचा आक्षेप तरी २२ लाखांची लाच घेतलेला PI पुन्हा सेवेत

सध्या एअर फोर्सकडून वापर सुरु असलेल्या LCA तेजस Mk1आवृत्तीमध्ये अमेरिकन इंजिन्सच आहेत. तेजसच्या नव्या आवृत्तीमध्ये सुद्धा ही इंजिन्स अगदी सहजतेने बसवता येतील. यावर्षी जनरल इलेक्ट्रीक्स बरोबर करार होऊ शकतो. हा करार झाला, तर फेब्रुवारी २०२० नंतर झालेला हा सर्वात मोठा संरक्षण करार ठरेल. मागच्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्यावेळी अपाचे आणि MH-60 रोमियो हेलिकॉप्टर खरेदीचा करार झाला होता.

हेही वाचा: आम्ही ईडी नाही; सीडी लावणार, प्रसाद लाड यांचा इशारा

भारत अमेरिकेकडून इंजिन विकत घेणार असला, तरी त्यात तंत्रज्ञान हस्तांतरणाचा समावेश नाहीय. त्यामुळे तेजससाठी लागणारी इंजिन्स भारतात बनवता येणार नाहीत. भविष्यातील फायटर विमानांसाठी स्वदेशी इंजिन निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत. 'तेजस' हे भारताचे चौथ्या पिढीचे बहुउद्देशीय फायटर विमान आहे. तेजसचे नवे व्हर्जन अधिक अत्याधुनिक असणार आहे.

loading image