नौदल तळासंदर्भात भारत-सेशल्समध्ये करार 

पीटीआय
मंगळवार, 26 जून 2018

भारत आणि सेशल्स या देशांदरम्यान नौदल तळासंदर्भात आज एक महत्त्वपूर्ण करार झाला. एकमेकांची चिंता लक्षात घेताना नौदल तळ विकसित करण्याच्या प्रकल्पावर पतप्रधान नरेंद्र मोदी आणि सेशल्सचे अध्यक्ष डॅनी अँतोनी ऑलन फॉरे यांच्यादरम्यान सहमती झाली. 
 

नवी दिल्ली : भारत आणि सेशल्स या देशांदरम्यान नौदल तळासंदर्भात आज एक महत्त्वपूर्ण करार झाला. एकमेकांची चिंता लक्षात घेताना नौदल तळ विकसित करण्याच्या प्रकल्पावर पतप्रधान नरेंद्र मोदी आणि सेशल्सचे अध्यक्ष डॅनी अँतोनी ऑलन फॉरे यांच्यादरम्यान सहमती झाली. 

काही दिवसांपूर्वी सेशल्सने भारताबरोबर आपल्या असम्पशन बेटावर नौदल तळ बनविण्याचा करार रद्द करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता सेशल्सची चिंता मिटली आहे. 

सेशल्सच्या अध्यक्षांशी झालेल्या चर्चेनंतर मोदी म्हणाले, की आम्ही एकमेकांच्या अधिकारांच्या मान्यतेच्या आधारावर असम्पशन बेटाच्या विकासासाठी एकत्रित काम करण्यावर सहमती दर्शविली आहे. फॉरे म्हणाले, की दोन्ही देश एकमेकांचे हित लक्षात घेऊन एकत्रितपणे काम करतील. दरम्यान, हिंद महासागरातील या प्रकल्पामुळे भारताला मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

भारत दहा कोटी डॉलरचे कर्ज देणार 
फॉरे यांच्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी सहा करारांवर सह्या केल्या. फॉरे यांनी बहुपक्षीय व्यापार करार, सुरक्षा आणि संरक्षणासंबंधी मोदींच्या दूरदृष्टीची स्तुती केली. भारताने सेशल्सला समुद्री सुरक्षा क्षमता वाढविण्यासाठी दहा कोटी डॉलरचे कर्ज देण्याचीही घोषणा केली. 

Web Title: India Seychelles agree to work on naval base project respect mutual concerns