
जम्मूमध्ये स्फोटाचा आवाज ऐकू आला. यानंतर हवाई सायरन वाजवण्यात आले. संपूर्ण जम्मूमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. लोकांना त्यांच्या घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जम्मूच्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. स्फोटाच्या आवाजानंतर जम्मूमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. जम्मूमध्ये ५-६ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानकडून पुन्हा ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. याचा घटनाक्रम एका प्रत्यक्षदर्शीने सांगितला आहे.