esakal | भारताला हिंदु राष्ट्र घोषित करा अन्यथा जलसमाधी घेईन; परमहंस आचार्यांचा केंद्राला इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

'२ ऑक्टोबरला भारत 'हिंदू राष्ट्र' घोषित करा नाहीतर जलसमाधी घेईन'

जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी केंद्र सरकारला भारत हिंदू राष्ट्र घोषित करा नाहीतर मी जल समाधी घेईन असा इशारा दिला आहे.

'२ ऑक्टोबरला भारत 'हिंदू राष्ट्र' घोषित करा नाहीतर जलसमाधी घेईन'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जगद्गुरु परमहंस आचार्य महाराज यांनी केंद्र सरकारला भारत हिंदू राष्ट्र घोषित करा नाहीतर मी जल समाधी घेईन असा इशारा दिला आहे. परमहंस महाराज यांनी म्हटलं की भारताला २ ऑक्टोबरपर्यंत हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी करतो. जर मागणी पूर्ण केली नाही तर मी शरयू नदीत जल समाधी घेईन. एढंच नाही तर मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे नागरिकत्व रद्द केले पाहिजे असेही वक्तव्य त्यांनी केले आहे.

परमहंस आचार्य यांनी १६ दिवसांचे उपोषणही यासाठी केले आहे. त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले होते. परमहंस यांनी सातत्याने मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे नागरिकत्व रद्द करण्याची मागणी करत आले आहेत. त्यांनी इतर क्षेत्रातील संतांनासुद्धा यासाठी एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. १ ऑक्टोबरला अनेक हिंदू संघटना परमहंस यांच्या समर्थनात हिंदू सनातन धर्म संसदेचं आयोजन करणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

हेही वाचा: हॉटेलमध्ये पोलिसांच्या छाप्यावेळी तरुणाचा मृत्यू; ६ जण निलंबित

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सूरतमध्ये मंगळवारी म्हटलं होतं की, हिंदुत्त्व ही एक वैचारिक व्यवस्था असून ती सर्वांना सोबत घेऊन चालते. प्रत्येकाला सोबत आणते. हिंदुत्त्व सर्वांना आपल्यामध्ये सामावून घेण्याचं काम करते आणि समृद्ध बनवते. कधी कधी अडचणी दूर करताना संघर्ष निर्माण होतो मात्र हिंदुत्व संघर्षासाठी नाही.

हिंदुंनी ही बाब समजून घेण्याची गरज आहे की अडचणी दूर करण्यासाठी ताकद गरजेची आहे. जग तरच मानेल आणि यासाठी आपल्याला ताकदवान बनण्याची गरज आहे. मात्र या ताकदीचा वापर आपल्याला अत्याचार करण्यासाठी नाही तर धर्माचे रक्षण करत जगाला सोबत आणण्यासाठी करायचा आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

loading image
go to top