'भारताने पाकिस्तानचा सन्मान करावा, नाहीतर ते अणुबॉम्ब टाकतील'; काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे वाद

Mani Shankar Aiyar controversy: काँग्रेसच्या आणखी एका नेत्याच्या वक्तव्यामुळे वादाची ठिगणी पडली आहे.
Mani Shankar Aiyar
Mani Shankar Aiyar esakal

Mani Shankar Aiyar: वारसा संपत्ती आणि वर्णभेदावरुन इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. आता काँग्रेसच्या आणखी एका नेत्याच्या वक्तव्यामुळे वादाची ठिगणी पडली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या पाकिस्तान संदर्भातील वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. भाजपने या मुद्द्यावरुन काँग्रेसला पुन्हा एकदा घेरलं आहे.

मणिशंकर अय्यर एका मुलाखतीमध्ये बोलत होते. यात ते म्हणाले की, ''भारताने पाकिस्तानचा सन्मान केला पाहिजे. कारण आपल्या शेजारी राष्ट्राकडे अणुबॉम्ब आहे. आपण त्यांचा सन्मान राखला नाही तर ते अणुबॉम्ब हल्ला करण्याचा विचार करु शकतात.'' अय्यर यांच्या या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला टीकेसाठी चांगला मुद्दा मिळाला आहे. भाजप नेत्यांनी काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

Mani Shankar Aiyar
PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

अय्यर म्हणाले की, ''पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे हे आपण विसरुन चालणार नाही. मला कळत नाही विद्यमान सरकार असं म्हणते की, तिथे दहशतवाद असल्याने आम्ही पाकिस्तानशी बोलणार नाही. दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा महत्त्वाची आहे. अन्यथा पाकिस्तानला वाटेल की, भारत अहंकारामुळे आम्हाला जगात छोटं दाखवत आहे. त्यामुळे पाकिस्तानमधला कोणताही वेडा माणूस अणुबॉम्बचा वापर करु शकतो.''

Mani Shankar Aiyar
PM Modi on Pitroda: सॅम पित्रोदांच्या 'वारसा संपत्ती'वरील विधानावर PM मोदींचं भाष्य; म्हणाले, "जिंदगी के साथ भी..."

द्वेष करुन किंवा बंदूक दाखवून आपण स्थिती सुधारु शकत नाही. पाकिस्तान एक सार्वभौम राष्ट्र आहे. त्यांचाही सन्मान करायला हवा. त्यांच्याशी चर्चा देखील सुरु ठेवायला हवी. पण, सध्या काय सुरु आहे? चर्चा होत नाहीये. त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे. काँग्रेसने दोन्ही देशातील संबंध वाढवण्यासाठी प्रयत्न केले. पण, गेल्या दहा वर्षात चर्चा बंद आहे. पंतप्रधान मोदी पाकिस्तानसोबत संघर्षाची भाषा करत आहेत, असं देखील अय्यर म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी सुरु आहेत. राजकीय पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये. सध्या तीन टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. १३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडेल. एकूण ७ टप्प्यात देशात मतदान होईल. ४ जून रोजी मतमोजणी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com