रशियन हॅकर्सचा अमेरिकेवर हल्ला; तपाससंस्था, कंपन्यांची सुरक्षेसाठी धावाधाव 

रशियन हॅकर्सचा अमेरिकेवर हल्ला; तपाससंस्था, कंपन्यांची सुरक्षेसाठी धावाधाव 

वॉशिंग्टन - रशियन हॅकर्सनी हेरगिरी करण्याच्या उद्देशाने संगणकीय यंत्रणांमध्ये घुसखोरी केल्याची बाब आढळून आल्यानंतर अमेरिकेतील तपाससंस्था आणि खासगी कंपन्यांना त्यांचे नेटवर्क सुरक्षित करताना मोठी धावाधाव करावी लागली. दरम्यान या रशियन सायबर हल्ल्यामुळे नेमके किती नुकसान झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या हल्ल्याची तातडीने दखल घेत होमलँड सिक्युरिटीच्या सायबर सिक्युरिटी युनिटने सोमवारी अलर्ट जारी करून सर्व कंपन्या आणि तपास संस्था यांना त्यांच्या सॉफ्टवेअर व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. खुद्द या युनिटने देखील त्यांच्या सायबर नेटवर्कमध्ये सुधारणा घडवून आणल्या होत्या. अमेरिकेच्या सुरक्षा विभागाने तयार केलेली अत्यंत अभेद्य अशी सायबर भिंत भेदण्यामध्ये या हॅकर्संना यश आले असून यामाध्यमातून त्यांनी ट्रेजरी आणि वाणिज्य विभागातील काही महत्त्वाच्या फाईल्सना हात लावण्यात यश मिळविले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नेटवर्क मजबूत करावे लागणार 
या ताज्या सायबर हल्ल्यामुळे सरकारचे सायबर नेटवर्क देखील सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. याआधीही या नेटवर्कवर अशाप्रकारचे हल्ले करण्यात आले होते. संरक्षणापेक्षा गुन्हा करणे अधिक सोपे असते त्यामुळे आम्हाला हे नेटवर्क मजबूत करण्यावर आणखी बरेच काम करावे लागणार असल्याचे सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजने म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com