
नवी दिल्ली : तिबेटी बौद्धधर्मीयांसाठी सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी भावी दलाई लामांच्या निवडीसाठी गादेन फोडरांग ट्रस्टला दिलेले सर्वाधिकार आणि चीनने त्यावर घेतलेला आक्षेप यापार्श्वभूमीवर भारत सरकारने या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करताना श्रद्धा व धार्मिक प्रथांबाबत काहीही बोलणार नाही असे म्हटले आहे. सोबतच, भारतातील सर्व धार्मिक स्वातंत्र्याचे सरकार समर्थन करेल, असेही म्हटले आहे.